Posts

उद्योजक चित्रकार : शं.वा. किर्लोस्कर तथा शं.वा.कि.

Image
  साहीत्यप्रेमी महाराष्ट्रात अनेक चित्रकारांनी मासीके चालवीली. त्यांची ही मासीके मुख्यत्वे चित्रकलेला वाहीलेली असत. व जोडीला ती ललित वाङ्मयालाही उत्तेजन देत. पण एका चित्रकाराने केवळ जाहीरातीपोटी एखादे नियतकालिक सुरु करणे व पुढे त्याला वाङ्मयीन दर्जा देऊन त्याचे एक अभिरुचीपूर्ण नियतकालिक होण्यात रुपांतर होणे हा मराठी साहीत्यसृष्टीतील एका चमत्कारच मानला पाहीजे हे मासीक होते ' किर्लोस्कर' व त्यांचे संपादक होते, शंकरराव वासुदेव किर्लोस्कर तथा सर्व महाराष्ट्र जसा त्यांना त्यांच्या आद्याक्षरावरून ओळखत होता ते महाराष्ट्राचे लाडके चित्रकार संपादक 'शं.वा.कि.'!  यासाठी आपणाला किर्लोस्कर घराण्याची थोडी पूर्व पिठीका पहाणे जरुरीचे आहे. 'किर्लोस्कर'चे आद्य प्रवर्तक श्री लक्ष्मणराव किर्लोस्कर हे बेळगांव जिल्ह्यातील गुर्लहोसूर येथील. लहानपणापासून त्यांना दोन गोष्टींची आवड होती. त्या म्हणजे पेंटींग करणे व निरनिराळ्या वस्तू निर्माण करणे. त्यांना दोन वडील बंधू होते. वासुदेवराव व रामूअण्णा. रामूअण्णांच्या पाठींब्याने लक्ष्मणरावांनी पेंटींग शिकण्यासाठी मुंबईच्या सर जे.जे.स्कुल ऑफ आर...

चित्रकार ते वेषभूषा संकल्पन - एक प्रवास : भानू अथैय्या

Image
आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कला इतिहासकार व क्युरेटर जेहरा झुमाभॉय ह्या न्यूयॉर्क मधील एशिया सोसायटी म्युझियमसाठी भारतातील एके काळी गाजलेल्या ‘प्रोग्रेसीव्ह आर्टिस्ट्स ग्रुप’च्या प्रदर्शनाची तयारी करीत असता त्याचा मागोवा घेण्यास आरंभ केला. त्यावेळी त्यांना प्रोग्रेसीव्ह ग्रुपच्या मुंबईतील शेवटच्या प्रदर्शनाचा कॅटलॉग मिळाला. तो अभ्यासत असताना त्यांना आढळले की हा ग्रुप केवळ पुरुष कलाकारांशी संबंधीत नव्हता. त्या प्रभावाखाली आधुनीक चित्रकला आविष्कृत करणाऱ्या  एका अनोळख्या  महिलेचेही नांव त्यामध्ये होते. आणि यावर झुमाभॉय यांनी संशोधन सुरु केले. ते नांव होते, भानुमती राजोपाध्ये. आणि त्या नांवाचा शोध घेत असता त्या थेट पोचल्या त्या भानू अथैय्या या नावापाशी. आणि या भानू अथैय्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून १९८३ मध्ये रिचर्ड ॲटेनबरो यांच्या 'गांधी' या चित्रपटाच्या कॉश्च्युम डिझाइनसाठी ऑस्कर अवार्ड पटकावणाऱ्या भानू अथैय्या ह्याच होत्या. ऑस्कर मिळताच भानू अथैय्या या जगप्रसीध्द झाल्या. कॉश्च्युम डिझाइनर म्हणून त्यांचे नांव सर्वत्र गाजू लागले. तसे ते आधीपासूनच चित्रपट सृष्टीत गाजत होते. पण चित्रक...

प्रोग्रेसीव्ह आर्टीस्ट ग्रुपचा शेवटचा शिलेदार : मनोहर म्हात्रे.

Image
  एखादी व्यक्ती इतकी चांगली असू शकते? कुणाबद्दल असूया नाही, द्वेष नाही, स्पर्धा नाही किंवा कुणाच्या अपरोक्ष कधी वाईट बोलणे नाही. आहे तो केवळ मनाचा चांगुलपणा, बोलण्यातील मार्दव, दुसऱ्याबद्दल केवळ आपुलकी आणि स्वभावातील पारदर्शकपणा. स्वतः कलाकार तर आहेच शिवाय कला क्षेत्रातील एवढी प्रचंड माहीती, वारसा आणि व्यासंग हे की एखाद्याला एनसायक्लोपीडीयाची गरजच भासू नये. आणि ही व्यक्ती म्हणजे ज्या प्रोग्रेसीव्ह आर्टीस्ट ग्रुपने कलेची मूल्यच बदलली त्या कलाकारामधील एक शेवटचे शिलेदारच म्हणा ना! किँवा ' द लास्ट एम्पेरीयर मनोहर म्हात्रे. चित्रकलेतील एक प्रयोगशील,  आणि आदरणीय असे नांव.   मनोहर म्हात्रें यांचा जन्म अलीबाग जवळील धाकोडे नावाच्या एका लहानश्या गावात झाला.  यांना त्याकाळातील अनेक चित्रकलेने झपाटलेल्या विद्यार्थ्यांप्रमाणे कलेच्या ओढीने ग्रासले होते. मिळेल ते पुस्तक, मिळेल तो कागद घेऊन त्याच्यावर चित्रे रेखाटने हे एकच काम मनोहर करीत असे. हा मुलगा पुढे काहीच करणार नाही याची जणू खात्रीच सर्वाना वाटत असे. आणि काहीच न येणाऱ्या विद्यार्थ्यांना जे.जे.स्कुल मध्ये घालतात हा एक प्रवाद ...

एक सज्जन, प्रेमळ, सच्चा कलोपासक पारशी : केकू गांधी.

Image
  माझ्या जे.जे.स्कुल ऑफ आर्ट च्या सहवासात जे.जे.च्या पुण्याईमुळे अनेक महापुरुष माझ्या संपर्कात आले. आणि त्यापैकी कांही तर माझ्या काळजाचा तुकडा बनून राहीले. अशीच एक प्रेमळ आणि मायेचा वर्षाव करणारी, आपल्या शांत आणि प्रेमळ स्वभावाने दुसऱ्यांची मनं जिंकणारी व्यक्ती माझ्या आयुष्यात आली, ती म्हणजे कलाक्षेत्रात ज्यांचे नांव अत्यंत आदरपूर्वक घेतले जाते ते कलोपासक केकू गांधी. मुळातच पारशी लोक हे प्रेमळ स्वभावाचे. त्यातही कलासक्त मनोवृत्तीचे असले की त्यांच्या आचार विचारातून, त्यांच्या वाणीतून तो खानदानीपणा आवर्जून दिसून येतो. अश्याच एका धनाढ्य पारशी कुटुंबात  कैखुश्रू मिनोचेअर गांधी यांचा जन्म  २१ फेब्रुवारी १९२० रोजी झाला. लहानपणापासून तो केकू या नांवानेच ओळखू जाऊ लागला.  वडील मोठे कारखानदार होते. त्यांचा केमीकल मोल्डींगचा कारखाना होता. वांद्र्याला समुद्राच्या जवळ तोंड करून असलेला त्यांचा 'केकी मंझील' हा मोठा बंगला होता. लहानग्या केकूचे आयुष्य तेथे मोठ्या लाडाकोडात गेले. मुंबईतील शालेय शिक्षण झाल्यानंतर केकू १९३८ साली लंडनला पुढच्या शिक्षणासाठी केम्ब्रीज येथे पेमब्रोक काॅलेजम...

कला क्षेत्रातील प्रसन्नता : डॉ. शरयू दोशी.

Image
  शरयू दोशी हे नांव घेताच आपल्या डोळ्यासमोर येते ते  एक अतीशय प्रसन्न चेहऱ्याचे, देखणें असे हसतमुख व्यक्तीमत्व. आणि त्याचसोबत येते ती म्युझियम समोरील मोठ्या दिमाखात उभी असलेली 'नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट'ची भव्य अशी गोलाकार दगडी इमारत, ज्यामध्ये देश विदेशातील महान कलाकारांच्या कलाकृती प्रदर्शीत केल्या जातात. तसाच त्यांचा संग्रहही केला जातो. आत गेल्यावर तेथील स्थापत्यरचना प्रथम आपले लक्ष वेधून घेते. संपूर्ण गोलाकार असलेल्या या इमारतीमध्ये पाच लेव्हल्स आहेत. प्रत्येक लेव्हलवर वेगवेगळी प्रदर्शने आकार घेत असतात. येथे सर्वसाधारण गॅलरीप्रमाणे कोणी प्रदर्शने भरवू शकत नाही. तर चित्रकारांचा व चित्रांचा दर्जा विचारात घेऊन त्यांची प्रदर्शने क्युरेट केली जातात. अश्या या खास प्रदर्शनांना आपण जेव्हां भेट देतो ती चित्रे, शिल्पे, छायाचित्रे, आपल्याला वेगळाच आनंद देऊन जातात. आणि याच गॅलरी मध्ये स्वतः जातीने उपस्थीत राहून वातावरण प्रसन्नमय करणारे, सुहास्य मुद्रेने वावरणारे एक व्यक्तीमत्व वावरत असे. डॉ. शरयू दोशी! दोशी नाव उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर येतात ती उद्योगपती वालचंद हिराचंद, लालचंद हिर...