एक आगळी वेगळी रामभक्ती.

     


आपल्या  भारतात  प्रभू श्री रामाविषयी कोणाला बरे आदर नाही? मग तो अयोध्येचा असो, आपल्या देवघरातील असो, किंवा आपल्या मनातील. आपण त्याला भक्तिभावाने पूजत असतो. रामनामाचा जप करत असतो.आणि मुख्य म्हणजे .दि. माडगूळकरांनी लिहिलेल्या सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेल्या 'गीत रामायणाला' देखील  आकाशवाणीवरून प्रसृत होण्याला   वर्षे आज झाली आहेत. अश्या या मर्यादा पुरुषोत्तम श्री प्रभू रामाला कोण बरे विसरेल! 



असेच एका गांव आपल्या या भारत वर्षात आहे, तेथील सर्व लोक रामभक्त आहेत. आणि हे गांव म्हणजे छत्तीसगढ मधील चंपा जिल्ह्यातील चरपोरा गावांतील समाज. १९ व्या शतकात जातीयतेमुळे या समाजाला देवळात प्रवेश वर्ज्य होता. भक्ती तर उराउरात भरली होती. आणि आपल्या जातिव्यवस्थेला ते बळी पडले होते. त्यामुळे १८९० साली संत परशुराम यांनी रामभक्तीची एक आगळी परंपरा सुरु केली. तेथील प्रत्येक व्यक्तीने आपलें सर्वांग राम नामाने आच्छादले. गावातील एकूण एक व्यक्ती या रामनामाने गोंदली गेली असून तो एक समाज म्हणून ओळखला जातो. 


हे राम राम असे अंगावर गोंदणे हे बालक जन्माला आल्यावर साधारण दोन वर्षाचे झालें की केले जाते. मग जसजसे ते मोठे होत जाते, त्याच्यात प्रगल्भता येते, तसतसे त्यामध्ये नामाची भर पाडत जाते. तेथे स्त्री पुरुष हा भेद नाही. कित्येकदा व्यक्तीच्या जिभेवर देखील पुसल्या जाण्याऱ्या शाईने नाव गोंदले जाते. मी वाढत्या वयाबरोबर गरज पडेल तशी नांवे वाढत जातात. अगदी अंगावर एखादे वस्त्र पांघरले असावें अश्या तऱ्हेचे हे सलग गोंदणे असते. आणि ही जमत 'रामनामी' म्हणून ओळखली जाते. 



या गावांत तुम्हांला भगवान प्रभू श्री रामाचे मंदीर आढळणार नाही.  त्येयांची प्थेंरतीमा कोठे आढळणार नाही.  आढळते ती त्यांची भक्ती, त्यांच्या मनात राम, ध्यानात राम, श्वासात राम, उश्वासात राम, कणाकणात राम भरलेला असतो. त्यांची वस्त्रेही रामनामाने सजलेली असतात. आणि हे लिखाणही एखाद्या सृजनशील सुलेखनकाराने केल्याप्रमाणे असते. ते केवळ लेखन नसते, तर त्यामागे असते ती  डिझाईन संकल्पना. एवढे सृजनशील लोक आहेत हे आपल्या रामभक्तीबाबत. राम ही दोन अक्षरे त्यांचा श्वास आणि ध्यास आहे. 


अश्या या आगळ्या वेगळ्या राम भक्तांची,या रामनामींच्या भक्तीची पाच प्रतीके आहेत.. जैतखांब म्हणजे खांबाला सफेत रंग लावून त्यावर ' राम' लिहीलेले असते. त्यांचे भजन अथवा धार्मीक परिषदेची ही जागा असते. , . वस्त्रावर रामनाम लिहीलेले असते, ही वस्त्रे हे लोक स्वतः विणून ती परिधानही करतात,.  संपूर्ण शरीरावर रामनाम गोंदून घेणे, आणि .नृत्य करतांना पायात घुंगरू घालणे, त्यातून स्वतःप्रती विश्वास दर्शवणे.  . मोर मुकूट अशी ही पाच प्रतीके हा समाज वापरतो. मोर मुकुट वापरणे, यातील मोर मुकुट हा मोरपिसापासून तयार केलेला असतो, या पंथातील संत तो वापरतात.  हा त्याग पावित्र्य याचे प्रतीक मानले जाते. अशी ही पाच प्रतीके ते वापरतात. आज जग आधुनिकतेकडे जात आहे, त्यामुळे हळू हळू हा पंथ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. केवळ शंभर एक लोक आज त्या गावात पहायला मिळतात. 



आणि अश्या या नक्षलवादी भागात जाऊन तेथील या 'रामनामी' ना भेटून त्यांच्याशी संवाद साधण्याचा हा प्रयास केला आमचे मित्र जाहीरात क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव असलेले या क्षेत्रात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय असे शेकडो सन्मान मिळवलेले 

श्री भूपाल रामनाथकर यांनी.  रामनाथकर हे नांव अनेक जाहीरात संस्थांशी जोडले गेलेले आहे. जे.जे.उपयोजीत कला संस्थेतील एक हुशार विद्यार्थी, पुढे जाहीरात क्षेत्रात व्यावसायिक म्हणून सर्जनशील कला संचालक, फोटोग्राफी एक छंद म्हणून जोपासलेले आणि त्यातून अनेक गोष्टींची ओळख करून देणारे एक सर्जनशील कलावंत.  रामनामींची प्रतिमाविहीन रामाची अवीट भक्ती, त्यात असलेले शुद्ध पावित्र्य,संपूर्ण जीवन निराकार असलेल्या  प्रभू रामाला अर्पित करून राहणाऱ्या या भक्तांना सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या दैनंदिन गरजा कधीच मोहवल्या नाहीत. रामनाथकाराना आढळले ते त्यातील रामनामाचा गजर आणि त्यांच्या रोजच्या जीवनातील साधेपणा आणि पावित्र्य. आणि रामनाथकारानी त्याच्याशी संवाद साधला. त्यांच्या मुद्रा  आपल्या कॅमेऱ्याने टिपल्या. त्यांचा भूतकाळ, वर्तमान आणि कदाचित त्यांचे अनिश्चित असा भूतकाळ.   


रामनाथकारानी रामनामाच्या संवादातून, त्यांच्या जीवनातून, त्याच्या राम भक्तीतून ज्या मुद्रा आपल्या कॅमेऱ्यात टिपल्या, त्या रसिकांना त्यांनी वरळीच्या 'स्नोबॉल ग्यालरीतून दाखवल्या. हा सर्व इतिहास पाहून आपण केवळ निशब्द होतो. 


प्रा. मं.गो. राजाध्यक्ष 

rajapost@gmail.com

Comments

Popular posts from this blog

स्वातंत्र्यवीरांचे आत्मार्पण

आमचा सुभाष गेला…

सतीश नाईकांचा शोध प्रवास : ‘गायतोंडे ते गायतोंडे बिटवीन टू मिरर्स’