प्रतीकाचा प्रभाव:
त्याच्या मित्राच्या बावीसाव्या वाढदिवसानिमीत्त पार्टी होती. या पार्टीमध्ये 'नेटिव्ह्ज अँड कलोनिअल्स' या विषयांवर फॅन्सी ड्रेस परीधान करण्याचा ड्रेस कोड ठरला होता. तेथे तो नाझी गणवेषात होता. दंडावरील पट्ट्यावर नाझी स्वस्तिकाचे चिन्ह होते. आणि नेमका तो क्षण 'सन' या वृत्तपत्राने कॅमेऱ्यात पकडला. अन दुसऱ्या दिवशी तो वृत्तपत्रात प्रसीद्ध झाल्यावर अवघ्या युरोपात खळबळ उडाली. कारण तो दुसरा तिसरा कोणी नसून ब्रिटनच्या राजघराण्याचा वारस राजपूत्र हॅरी होता. आणि त्यामुळे ब्रिटिश जनमानसात संतापाची लाट उसळली. दुसऱ्या महायुद्धाच्यावेळी हिटलरच्या नेतृत्वाखालील नाझी जर्मनीने ज्यू वंशीयांची जी कत्तल केली, व ज्या छळछ्यावण्यामध्ये हे क्रूर प्रकार घडले, ते अद्यापही जगभरातील जनतेच्या उरात ठासून बसले आहेत. पुढे नाझी जर्मनीचा पाडाव करून अश्विच छळछावण्यातून मित्र राष्ट्रांनी ज्यूंची सुटका केली. त्या गोष्टीला त्या वर्षी साठ वर्षे पूर्ण होत होती. त्या निमीत्त ब्रिटनमध्ये विविध कार्यक्रमांची आखणीही सुरु होती. आणि या अश्या परीस्थितीत राजपूत्र हॅरीचे वर्तन ब्रिटिश जनतेला अयोग्य वाटले.
अश्या या जगन्मान्य स्वस्तिकाला आर्यांचे पूज्य चिन्ह मानून स्वतःला शुद्ध आर्य मानणाऱ्या हिटलरने त्याचा वापर आपल्या ध्वजासाठी केला. तत्पूर्वी या स्वस्तिकाचा वापर जर्मनीमध्ये करण्यात येत होता. थिऑसॉफिकल सोसायटीच्या चिन्हांत त्याचा वापर केला गेला होता. जागतीक कीर्तीचा कवी-साहित्यिक व नोबेल प्राईझ विजेता रुडयार्ड किपलींग यांनीही आपल्या सहीसोबत त्याचा वापर केलेला दिसून येतो. आपल्या पुस्तकावरही रुडयार्ड किपलींग स्वस्तीक वापरीत असत. पण पुढे हिटलरच्या हुकूमशाही सरकारने ते चिन्ह स्वीकारल्यामुळे रुडयार्ड किपलींग यांनी त्याचा वापर करणे स्वतः थांबवीले. पहील्या महायुद्धात अमेरीकन सोल्जरच्या ४५ व्या इन्फन्ट्री तुकडीने नारींगी रंगाच्या स्वस्तिकाचा वापर आपल्या खांद्यावर वापरला होता. पण पुढे हिटलरच्या वापरामुळे स्वस्तीक चिन्ह प्रसिद्धीला आले. व हिटलर आणि स्वस्तीक हे एक समीकरणच बनले.
२० एप्रील १८८९ रोजी जन्माला आलेल्या ॲडाॅल्फ हिटलरला चित्रकार म्हणून आपले भवितव्य घडवायची इच्छा होती. त्यासाठी त्याने वडीलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन व्हिएन्ना येथील 'अकॅडमी ऑफ आर्ट' या संस्थेत प्रवेश घेण्याचे प्रयत्न केले. पण दोन वेळा प्रयत्न करूनही हिटलरला तेथे प्रवेश मिळाला नाही. पण त्यामुळे खचून न जाता स्वतःच्या हिमतीवर त्याने तेथेच राहून चित्रकलेचा अभ्यास सुरु केला. एवढेच नव्हे, तर 'मेन काम्फ' या आपल्या आत्मचरीत्राच्या प्रचंड खपामुळे रॉयल्टी मिळून त्याचे नशीब उघडण्यापूर्वी हिटलर स्वतः पेंटींग करून व त्याची विक्री करून तसेच त्यांची कार्ड्स बनवून मिळणाऱ्या पैश्यामधून स्वतःचा खर्च चालवीत असे. हिटलर स्वतः फाईन आर्टचे विध्यार्थी असल्यामुळे संगीत, नाट्य, पेंटींग, शिल्प, वास्तूशास्त्र, निसर्गचित्रे आदी कलांचा त्यांचा अभ्यास होता. व्हिएन्नामधे पेंटींग विक्री करून जे काही अर्थार्जन होत असे त्यातून हिटलर व्याख्याने ऐकण्यात, नाटके -ऑपेरा पहाण्यात खर्च करीत असत. शिवाय जलरंग, तैलरंग, उत्तमोत्तम ब्रश, कॅनव्हास आदी साहित्यहि ते खरेदी करीत. एक सृजनशील चित्रकार या नात्याने त्यांनी सुमारे दोन ते तीन हजार रेखाचित्रे, निसर्गचित्रे, व पेंटिंग्ज बनवीली होती. पहील्या महायुद्धाच्या वेळी फ्रंटवर असतांना हिटलरनतेथील दृश्यांची चित्रेही मिळेल त्या फुरसतीच्या वेळी आविष्कृत केली. त्याच सुमारास मिलिटरी वृत्तपत्रासाठी ते व्यंगचित्रे व आराखडे देखील तयार करीत असत. या कलाकाराचे राजकारण्यांत रूपांतर होण्यास कदाचीत, व्यावसायिकांचा राजकारणातील प्रभाव हेही कारण असेल. मात्र राजकारणात गेल्यावरही हिटलर यांनी जर्मनीविषयी जी कांही उदात्त स्वप्ने आपल्या दूरदृष्टीने पाहीली होती, ती सत्यात येऊन निर्माण झालेल्या गोष्टी म्हणजे त्यांची 'फोक्स व्हॅगन' ही सामान्य माणसाला परवडेल अशी गाडी, राष्ट्रीय हायवे, रॉकेट सायन्स व स्वतःच्या देशाबद्दल जनतेची कडवी देशभक्ती. एवढेच नव्हे तर त्याच्या कलासक्त मनाने युद्धानंतर बर्लीन शहराची पुनर्रचना करणारे मॉडेल देखील तयार करून ठेवले होते.
१९१९ मध्ये ॲडाॅल्फ हिटलरने नाझी पार्टीला स्वतंत्र ध्वज व चिन्ह हवे असल्याची गरज ओळखली. डॉ. फ्रेड्रीक क्रोन या दंतवैद्याने या ध्वजाचे संकल्पन केले. लाल पार्श्वभूमीवर सफेद वर्तुळामध्ये काळ्या रंगात स्वस्तीक अशी त्याची रचना होती. स्वस्तिकाचे हात डाव्या बाजूला असावेत, अशी डॉ. क्रोन यांची इच्छा होती. कारण बौद्ध धर्मामध्ये हे स्वस्तीक भाग्य व सुबत्तेचे प्रतीक मानले जात होते. पण हिटलर यांना ते उजव्या बाजूचे व तिरके हवे होते. हिटलरने आपल्या ध्वजाचेही वर्णन केले आहे. त्यातील लाल रंग समाजवादी चळवळ दर्शवतो. तर शुभ्र रंगात राष्ट्रवादाची कल्पना साकारते. स्वस्तिकामधे आर्य मानवाची
विजयाच्या मोहीमेची धडपड जाणवते.
मनाने, वृत्तीने कलावंत असलेल्या हिटलरने स्वस्तीक हे त्याच्या संपूर्ण अर्थाने स्वीकारले होते. पण त्या ध्वजाखाली लढणाऱ्या कित्येकजणांना त्याचा अर्थही माहीत नव्हता. पण ७ आगस्ट १९२० रोजी अधीकृतरित्या वापरात आलेल्या या ध्वजाने मात्र संपूर्ण जगात खळबळ माजविली. हिटलर आज हुकूमशहा म्हणून सर्व जगात ओळखला जातो. पण चित्रकार अथवा यशस्वी पेंटर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या कलाकाराला लिन्झमधील फाईन आर्ट इंस्टीट्यूटने प्रवेश नाकारला नसता तर कदाचीत जगाचा इतिहासच बदलला असता. १९४५ साली अमेरीकन सैनिकांनी जर्मन किल्ल्यावर धाड टाकली तेव्हां त्यांच्या हाती हिटलर यांची चार जलरंगातील निसर्गदृश्ये आली. आजही ती अमेरीकेच्या ताब्यात असून हिटलर यांचे वारस ती गेली तीस वर्षे मिळवण्याच्या खटपटीत आहेत. पण जर्मन-अमेरीका तहानुसार ती अमेरिकेची मालमत्ता असल्याचे अमेरीकेचे म्हणणे आहे. शेवटी प्रश्न उरतो की, स्वस्तीक हे कांही हिटलर यांची निर्मिती नाही. त्यामुळे या प्रतीकावर बंदी घालण्याचा हक्क अथवा अधीकार कोणाला कसा पोचु शकतो? कारण निसर्ग निर्मीत असोत वा मानव निर्मीत असोत, या प्रतीकांवर कोणीही मालकी हक्क सांगू शकत नाही. ती संपूर्ण जगाच्या मालकीची असतात!
-प्रा.मं.गो.राजाध्यक्ष




Comments
Post a Comment