सेलिब्रिटी नावाचा रोग.
सेलेब्रिटी नांवाचा एक रोग या देशाला लागला आहे,
हळूहळू सर्वामध्ये तो फोफावत चालला आहे,
याची लक्षणे मोठी गंभीर असतात,
माणसामध्ये गुपचूप सेलिब्रिटी पसरतात,
आख्खी ' खाना 'वळ यांच्या देही ठाण मांडते,
त्यांच्या एका दर्शनासाठी
यांची तहानभूक हरपते,
याच्या दर्शनासाठी दिवसेदिवस घरासमोर ठाण मांडून,
रस्ते अडवून, हे लोक बसतात,
यांची आरती ओवाळून आपला दिवस साजरा करतात,
यांच्या अंध प्रेमामुळे, सेलिब्रिटीही माजून जातात,
स्वतःला देशाचे पालनहार समजू लागतात,
उन्मादाचा वायू त्यांच्यात भरून वाहू लागतो,
दुसऱ्याचा जीव त्यांना कवडीमोल वाटू लागतो,
कारण यांच्या पाठीशी निरुद्योगी भक्तगण
उदो उदो करत नाचत असतो,
पडद्यावरचे चाळे यांचे, सत्य समजूनी चालत असतो,
स्वत:लाही त्यात पहात असतो, त्याचीच नक्कल उतरीत असतो.
काही राजकारणी असतात गुन्हेगार सेलीब्रीटींचे गॉडफादर,
कृपा त्यांची असते यांच्या अवगुणांवर,
त्यांना पहाताच देती प्रशस्तिपत्रक निष्पापतेचे,
भावुकतेचे... बाळलीलांचे,
जरी चिरडती हे निष्पाप माणसांना,
नसे खेद वा खंत त्याची बिलकूल यांना,
जरी धाडती सजा सुनवूनी यासी कोठडीत,
तेथेही असती याचे सरकारी अंध भक्त,
बसवूनी आदबीने मागती स्वाक्षरी याची,
संधीच मिळे त्यांना जणू साधू संत आल्याची,
देशभर चालती पूजा प्रार्थना या महा मानवाच्या सेवेशी
भक्तगण ते उभे ठाकती त्यांच्या देवाच्या द्वाराशी,
वाटे त्यांना अन्याय हा कोठडीत धाडण्याचा,
सुटका होता देश अवघा करी जल्लोष उत्सवाचा...
खास सुरक्षा देऊनी बाळा धाडी विमानतळावरती,
खास व्यवस्था पुरवूनी त्याला सुरक्षीत ते पोचवीती...
लाज वाटते पाहुनी सारे, हीच काय समानता आपल्या देशाची,
पूजले जाती येथ सेलीब्रीटी अन हत्या होते मानवतेची,
यांच्यापैकी कांहीना वाटे हा तर देश आपल्या मालकीचा,
पायाखाली तुडवू भूमी ही, करू नायनाटही मानवतेचा,
कुणीही नाही याना अडवू शकतो, लाथा बसती त्या लोकाना,
हेच नव्हे तर यांची पोरे माजूनी करती वृथा वल्गना,
एका खिशात यांच्या असतो पैसा अपरंपार,
दुसऱ्या खिशात असते गुंडपुंडांची टोळी बेसूमार,
असते याना खात्री यांच्या जयजयकाराची,
तशीच असते, चॅनल आणि प्रसिद्धी माध्यमांची,
पैसे फेकुनी चाले यांची दिखाऊ समाजसेवा,
मानवतेला कलंक लावूनी, चेहरा घेई 'बीइंग ह्युमन' तेचा
बुरख्या आड तो असे चेहरा ' इनह्युमन' तेचा,
सामान्यांना मिळती लाथा, पुजले जाती गुन्हेगार सेलिब्रिटी आमचे !
बाल्कनीतून देती दर्शन, धन्य होती रोगी तयांचे,
या भक्तगण रोग्यांची संख्या अमर्याद असते,
शहर अस्थीर करण्यांस पुरेशी असते,
नशीब, हे केवळ सेलीब्रीटीच्या नांवे भंडारा उधळतात,
राजकारणी तर देशाला आग लावून त्याची राख रांगोळी करतात,
पोलीस ठाणे फोडून गुन्हेगार नेत्याला पळवून नेतात,
जेव्हां हे लोक देवदर्शनासाठी मंदीरात येतात,
तेव्हां बिचारे देवही या व्ही आय पी भक्तांची वाट पहात असतात,
मंदीराचे विश्वस्त यांचे आदराने स्वागत करून
त्याना बिचाऱ्या देवाचे दर्शन घडवून आणतात.
नशीब त्या देवांचे....
मंदीरात ते एकाजागी बसवलेले असतात घट्ट,
नाहीतर हे देवांचे चालक त्यांनाच उचलून
या सेलेब्रिटींकडे नेवून त्यांना दर्शन देण्याचा धरून बसले असते हट्ट.
हीच वेळ का येईल पुढती या आमच्या देशावरती ?
दिसे अंध:कार हा भरूनी येई भवीष्य काळावरती,
महाकठीण हा रोग आहे सेलेब्रिटींचा,
नाही तयावर औषध कांही, लागण होता, असाच तो भोगायचा !
- मं. गो. राजाध्यक्ष.

Comments
Post a Comment