जे. जे. च्या मातीचा गंध - सुगंध
म्हणतात मातीचा गूण आपणांला घडवतो
आणि ती माती जर कां जे.जे. स्कुलची असली तर...
तर त्या मातीच्या सुगंधातून अवतरलेत अनेक कलाकार
कोणी चित्रकार, कोणी शिल्पकार, कोणी वास्तूविशारद
अन कोणी विचार प्रसारणेचे उपयोजीत कलाकार
आणि कलाकार तरी कसे ?
जे.जे.च्या मुशीतून घडलेले, जमशेटजींच्या पुण्याईने पावन झालेले
जे.जे.च्या मुशीतून घडलेले, जमशेटजींच्या पुण्याईने पावन झालेले
इंद्रधनूची शिडी करून आकाशाच्या कॅनव्हासवर मनाच्या कुंचल्याने
प्रतीसृष्टी निर्माण करणारे...
आकाशाला गवसणी घालणारे
आकाशाला गवसणी घालणारे
असे माझे जे.जे...
जेथे या सर्वांबरोबर मीही घडलो
अनेकदा धडपडलो, पण या जे.जे.च्या भक्कम आधाराने सावरला गेलो
आजही इतक्या वर्षांनी त्या पवीत्र मातीचा सुगंध घेण्यासाठी
तिचा गंध मस्तकी लावण्यासाठी
पावले परत परत वळतात माझ्या मातृ संस्थेकडे
तेव्हां मधला काळ झपकन गळून पडतो
आणि...
जे.जे.च्या कुशीत मी पुन्हां विध्यार्थी बनून सामावतो!
आणि...
जे.जे.च्या कुशीत मी पुन्हां विध्यार्थी बनून सामावतो!
- मं.गो. राजाध्यक्ष

Comments
Post a Comment