सतीश नाईकांचा शोध प्रवास : ‘गायतोंडे ते गायतोंडे बिटवीन टू मिरर्स’
२७ फेब्रूवारी , २०२५ ! महीन्यापूर्वीच सतीश नाईकांचा फोन आला . ही तारीख राखून ठेवा . त्या दिवशी माझ्या गायतोंडेवरील ग्रंथाचे प्रकाशन आहे . अर्थातच सतीश याचा हा प्रकल्प पूर्णत्वाला नेणाऱ्या या कालावधीतील संपूर्ण प्रवास पहाणे आवश्यक ठरेल . एखादा माणूस एका विलक्षण वेडाने झपाटलेला असतो . त्यासाठी येणारी संकटे आनंदाने अंगा खांद्यावर कुरवाळण्याची त्याला संवय असते . आणि आपण योजलेले काम पूर्ण झाले की आनंदाने थपथपलेल्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव आणून तृप्त मनाने त्या कामापासून दूर होतो . किती विलक्षण स्थितप्रज्ञाप्रमाणे वागण्याची क्षमता बाळगून असतो हा माणूस ! आणि हा विलक्षण , चतुरस्त्र असा एकमेव माणूस म्हणजे आमचा मित्र तसेच चित्रकार , लेखक , पत्रकार , संपादक , साहीत्यिक , कला समीक्षक , वास्तू विशारद अश्या अनेक बिरुदानी नावाजलेला , ' चिन्ह ' या आपल्या कलेला वाहीलेल्या वार्षिकाला जीवापलीकडे जपणारा व लोक प्रबोधन करणारा सतीश नाईक नांवाचा अवलीया . कला विश्वांत नावाजलेला . जे . जे . स्कु...