Posts

Showing posts from March, 2026

समीर खानझोडे

Image
समीरला मी पाहीले ते जे . जे . मध्ये . आमच्या पुढील बॅचचा तो विद्यार्थी . त्यावेळी प्रत्येक वर्गात साधारणाने पन्नास एक विद्यार्थी असत . आणि आमची संस्था एकाच इमारतीत असल्याने आम्ही सर्व एका कुटुंबाच्या शाखाप्रमाणे आजूबाजूला विस्तारलों होतो . पहील्या वर्षांपासून शेवटच्या वर्ष्यापर्यंत सर्वच विद्यार्थी   एकमेकांना ओळखत असत . मित्राप्रमाणे वागत असत . आणि वर्गशिक्षकही प्रत्येक वर्गावर एकच असे संपूर्ण वर्षभर . त्यामुळे आमच्या पुढील बॅचचे विद्यार्थी देखील आम्हाला जवळचे होते .   मग तो   समीर खानझोडे   असो , वीरू हिरेमठ असो , सुधीर कर्नाटकी असो , वा प्रकाश कावळे असो , सर्वच आमच्या माहितीतील आणि जवळिकीतील . आणि समीर जास्त ध्यानात राहीला तो त्याच्या गुणामुळे . त्याच्या सद्वर्तनामुळे आणि त्याच्या शांत व कोणालाही न दुखावणाऱ्या स्वभावामुळे . त्याच्यातील सज्जनपणा सतत जाणवत असे . आणि कामातले वेगळेपण आणि शिस्त .   अकोल्यात जन्मलेला समीर हा इतर विद्यार्थी जसे वेगवेगळ्या गावाहून जे . ज...