एक आगळी वेगळी रामभक्ती.
आपल्या भारतात प्रभू श्री रामाविषयी कोणाला बरे आदर नाही ? मग तो अयोध्येचा असो , आपल्या देवघरातील असो , किंवा आपल्या मनातील . आपण त्याला भक्तिभावाने पूजत असतो . रामनामाचा जप करत असतो . आणि मुख्य म्हणजे ग . दि . माडगूळकरांनी लिहिलेल्या व सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेल्या ' गीत रामायणाला ' देखील आकाशवाणीवरून प्रसृत होण्याला वर्षे आज झाली आहेत . अश्या या मर्यादा पुरुषोत्तम श्री प्रभू रामाला कोण बरे विसरेल ! असेच एका गांव आपल्या या भारत वर्षात आहे , तेथील सर्व लोक रामभक्त आहेत . आणि हे गांव म्हणजे छत्तीसगढ मधील चंपा जिल्ह्यातील चरपोरा गावांतील समाज . १९ व्या शतकात जातीयतेमुळे या समाजाला देवळात प्रवेश वर्ज्य होता . भक्ती तर उराउरात भरली होती . आणि आपल्या जातिव्यवस्थेला ते बळी पडले होते . त्यामुळे १८९० साली संत परशुराम यांनी रामभक्तीची एक आगळी परंपरा सुरु केली . तेथील प्रत्येक व्यक्तीने आपलें सर्वांग राम नामाने आच्छादले . गावातील एकूण...