Posts

Showing posts from March, 2025

आमचा सुभाष गेला…

Image
आज अचानक आमचा सुभाष गेला . तशी त्याची प्रत्येक वेळी प्रत्येक कामात नेहमी गडबड असायचीच ! आमची कांही कामे असली की , मग तो आमचं काही एक न ऐकता ती कामे उरकून यायचा . मला म्हणायचा सर , तुम्ही आता काय काळजी करू नका . आम्ही आहोत ना !   अहो सर , तुम्ही आम्हांला शिकवलं म्हणून आम्ही आज लायक ठरलो आहोत . माझ्या बायकोचा तो वर्गमित्र . तिला बहीण मानायचा . भाऊबीजेला हक्काने यायचा . आणि कधीही फोन केला की म्हणायचा , भारती आज माझा वाढदिवस आहे . विसरलीस काय ! काय भेट देणार आहेस मला . असे वाढदिवस त्याचे महिन्यातून एक दोन तरी असायचे . अर्थात त्यामागे असायचा तो त्याचा मिस्कीलपणा . आणि त्यानंतर असायचे ते त्याचे खळाळून हसणे . चेहऱ्यावर कायम हास्य धारण करूनच हा जणू जन्माला आला होता . आकर्षक असे व्यक्तिमत्व , गौरवर्ण , उंचापुरा अन देखणा , आमच्या डोक्यावरील केस गेले तरी त्याच्या डोक्यावर भरगच्च केस , आता ते रुपेरी झालें होते .   सुभाष आणि त्याची तितकीच बोलकी पत्नी शुभदा हे जणू आमच्या आयु...