Posts

Showing posts from July, 2024

आज रंग बेरंग झाले.

Image
कांही माणसे जन्माला येतात ती सर्वांना सुगंध वाटत , त्यांच्या जीवनात रंग भरत आणि सर्वांच्या मनात एक नाते जोडत त्यांची वाटचाल सुरु असते . असेच एक जोडपे आम्ही पाहीले , जे देवाने केवळ एकमेकांसाठी बनवले होते . त्यांच्या गाठी स्वर्गातच बांधल्या होत्या . आणि हे जोडपे म्हणजे कॅम्लिनचे सुभाष दांडेकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती रजनी दांडेकर व कला विश्वातील सर्वांच्या लाडक्या रजनी वहीनी . दोघांचेही व्यक्तिमत्व अतिशय सुंदर असे . खानदानी   देखणे सौंदर्य , सुहास्य वदन , जिभेवर साखर पेरल्याप्रमाणे सर्वांशी गोड बोलणे आणि एकदा का कोणाच्या सान्नीध्यात आले की त्या व्यक्तीवर त्यांची छाप पडलीच म्हणून समजा .   वास्तविक कॅमल ह्या नावाला खूप मोठी पार्श्वभूमी आहे . आरंभाला १९३१ साली दिगंबर परशुराम उर्फ काकासाहेब दांडेकर या तरुण केमिस्ट्री मधील पदवीधराने आपल्या इंजिनीअर असलेल्या वडील बंधू गोविंद यांना सोबत घेऊन ' दांडेकर अँड कंपनी ' नांवाने शाई पावडर बनवण्याचा कारखाना सुरु केला . ह...